कार बाजारात बनावट कागदपत्राद्वारे कारची विक्री

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कार बाजारात विक्रीसाठी ठेवलेली कार ही बनावट कागदपत्रे तयार करून विक्री करत वाहनाचे पुढचे कुठलेही हप्ते न भरल्याच्या प्रकार अजिंठा चौकातील श्री कार बाजार येथे उघडकीला आला आहे. याबाबत बुधवार २ नोव्हेंबर रेाजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख मुजम्मिल शेख नाझीम (वय 29, रा. रजा कॉलनी, मेहरून, जळगाव) हे आपल्या कुटुंबीयांचा वास्तव्याला आहे. त्यांनी त्यांच्या वडिलांचे नावे असलेली कार क्रमांक (एमएच १२ ओएक्स ९०७०) ही विक्रीसाठी सलार नगरातील गिरधर काशिनाथ सोनवणे यांच्या अजिंठा चौकात श्री कार बाजार दुकानात कमिशनवर विक्रीस ठेवली होती. परंतु गिरधर काशिनाथ सोनवणे, संजय भुतडा, संतोष बडगुजर आणि डॉ. अभिजीत मोतीराम पवार यांनी संगनमताने वाहनाचे खोटे दस्तऐवज तयार करून विक्री केली. तसेच या वाहनाचे कर्जाचे हप्ते थकविले. हा प्रकार समोर आल्यानंतर कारमालक शेख मुजम्मिल शेख नाझीम यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली. न्यायालयाच्या आदेशानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवार २ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता संशयित आरोपी गिरीधर काशिनाथ सोनवणे, संजय भुतडा, संतोष बडगुजर आणि डॉ. अभिजीत मोतीराम पवार सर्व रा. जळगाव यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे करीत आहे.

Protected Content