जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणाऱ्या २८ वर्षीय तरुणीचे अज्ञात व्यक्तीने मोबाईलवरून अश्लिल फोटो टाकून बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात राहणारी २८ वर्षीय तरूणी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २६ मार्च ते८ एप्रिल दरम्यान अज्ञात अनोळखी नंबरवरील व्यक्तीने स्वतःची ओळख लपवून तरूणीची बदनामी होईल या उद्देशाने तरुणीला आणि तिच्या वडिलांना अश्लिल व धमकीचे मेसेज टाकले. त्याचप्रमाणे तरुणीचे असेल फोटो डिजीटलच्या माध्यमातून अश्लिल फोटो तयार करून सोशल मीडीयावर टाकून बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तरुणीने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात मोबाईलधारक विरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईलधारका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.