पतपेढीच्या तत्कालीन संचालकांकडून वसूल होणार रक्कम

जळगाव प्रतिनिधी | बीएचआरचा घोटाळा चर्चेत असतांनात आता जळगाव नागरी पतपेढीच्या तत्कालीन संचालकांवर जबाबदारी निश्‍चीत करून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत.

याबाबत वृत्त असे की, जळगाव नागरी सहकारी पतपेढीच्या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०चे कलम ८८ अन्वये करण्यात आलेल्या चौकशीनुसार तत्कालीन ११ संचालकांवर २ लाख १७ हजार ७६७ रुपयांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये दिलीप चिंतामण चौधरी, कुसुम प्रभाकर पाटील, दयाराम धोंडू पाटील, खुशाल तापीराम बोरोले, सुधाकर होना पाटील, सिद्धार्थ बापू तायडे, शालिग्राम लक्ष्मण बेंडाळे, सविता अनिल भोळे, किरण विष्णू पाटील, मालती गजानन भंगाळे व सुधाकर विश्वनाथ ढाके या ११ तत्कालीन संचालकांचा समावेश आहे.

या संचालकांकडून संबंधीत रक्कम जमीन महसूलच्या थकबाकीप्रमाणे वसूल करण्यासाठी पतसंस्थेच्या व्यवस्थापकास अधिकार प्राप्त झाले आहेत. त्यांच्यामार्फत वसुली प्रमाणपत्राची अंमलबजावणी करून ही रक्कम वसुली करण्यात यावी, असे जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी पतपेढीला कळवले आहे.

Protected Content