दुचाकी घेण्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह दोघांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । जळगावातील अयोध्या नगर येथील माहेर असलेल्या विवाहितेचा ५० हजार रूपयांसाठी छळ करणाऱ्या पतीसह सासू व नणंद यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील आयोध्या नगरात माहेर असलेल्या विवाहिता दामिनी ज्ञानेश्वर पाटील (वय-२२) यांचा विवाह चाळीसगाव तालुक्यातील वाघाडी ता. शिरपूर जि. धुळे येथील ज्ञानेश्वर मधुकर पाटील यांच्याशी ३ जानेवारी २०२१ रोजी झाला. सुरूवातीचे दोन महिने चांगले गेले, त्यानंतर पती ज्ञानेश्वर यांनी लहान लहान गोष्टींवरून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर दुचाकी घेण्यासाठी विवाहितेन माहेरहून ५० हजार रूपये आणावे यासाठी शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. यासाठी सासू छायाबाई मधुकर पाटील आणि नणंद सविता सोनू पाटील यांनी देखील ज्ञानेश्वरला खोटी माहिती देवून शिवीगाळ व मारहाण करण्यास परावृत्त केले. विवाहितेने जळगाव येथील माहेरी निघून आल्या. विवाहितेच्या फिर्यादीवरून पतीसह सासू व नणंद यांच्या विरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रतिलाल पवार करीत आहे.

Protected Content