महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा विविध मागण्यांसाठी मोर्चा (व्हिडीओ)

morcha

जळगाव प्रतिनिधी । येथील महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटने ‘केंद्रांचे समायोजन रद्द’ करण्यात यावे तसेच अंगणवाडी महिलांच्या विविध मागण्यांसाठी आज (मंगळवार) रोजी शिवतीर्थ मैदानापासून नेहरू पुतळा, टावर चौक व जिल्हा परिषदेवर मोर्चा धडकणार आहे.

जिल्हयातील ३,४७२ अंगणवाडी केंद्रांपैकी ५०० मीटर अंतर्गत येणा-या सुमारे २,३३६ अंगणवाडी केंद्रांचे समायोजन करण्याबाबत मा. आयुक्त, एकात्मिक बालविकास सेवा योजना, नवी मुंबई यांच्या आदेशान्वये महिला व बालविकास अधिकारी जिल्हा परिषद जळगांव यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी यांना आदेश दिले आहेत.

अंगणवाडी केंद्रांचे समायोजन झाल्यास जिल्हयातील सुमारे ४६०० विधवा, परितक्त्या, घटस्फोटीत, प्रौढ कुमारीका, व कुटुंब प्रमुख अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका बेरोजगार होणार आहेत. म्हणून कोणत्याही परिस्थितीत अंगणवाडी केंद्रांचे समायोजन करण्यात येवू नये. अंगणवाडी केंद्रांचे काम जलदगतीने होण्यासाठी अंगणवाडी सेविकांना शासनाने मोबाईल हॅण्डसेट पुरविले आहेत. परंतु त्यापैकी बहुसंख्य मोबाईल हॅण्डसेट नादुरुस्त व बिघाड झालेले आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविकांचे आर्थिक नुकसान होत आहे. म्हणून नादुरुस्त व बिघाड झालेले हॅण्डसेटच्या दुरुस्तीची जबाबदारी शासनाने घ्यावी किंवा दुरुस्तीसाठी अंगणवाडी सेविकांना निधी उपलब्ध करुन देण्यात यावा. मोबाईल दुरुस्तीसाठी अंगणवाडी कर्मचा-यांना खर्च करणा-यास भाग पाडणान्यांची चौकशी करुन त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी. शिरुड बिट ता. अमळनेर, गारखेडा बिट, फत्तेपुर बिट ता. जामनेर या बिटातील अंगणवाडी
कर्मचा-यांचे थकीत मानधन विनाविलंब अदा करण्यात यावे. सचिव, महिला व बालविकास विभाग यांच्या आदेशानुसार जिल्हयातील अंगणवाडी सेविका,
मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना ओळखपत्र पुरविण्यात यावे. अंगणवाडी कर्मचा-यांना सुमारे २ वर्षापासूनचे प्रवासभत्ते बिलाची थकीत रक्कम मा.आयुक्त यांच्या आदेशानुसार त्वरीत अदा करण्यात यावे.

यावेळी मोर्चासाठी जिल्हयातील हजारो अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांनी भागिदारी केली. मोर्चा यशस्वी करण्यासाठी मिनाक्षी चौधरी, मंगला नेवे, चेतना गवळी, सविता महाजन, पुष्पा परदेशी, संगिता निंभोरे, शंकुतला चौधरी, रेखा नेरकर, रमा अहिरे, सुनंदा नेरकर, उज्वला पाटील, साधना पाटील, बेबी पाटील, शोभा जावरे, सरला पाटील, आशा जाधव, रत्ना सोनवणे, आक्का सपकाळे, वंदना कंखरे, नंदा देवरे, सुनीता नेतकर, सविता वाघ, ज्योती पाटील, सुलोचना पाटील, सुरेखा मोरे, मिना गढरी, निता सपकाळे यांनी प्रयत्न केलेत.

Protected Content