शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा फैजपूरात निषेध

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावरील हल्ल्याचा निषेध व्यक्त करत शहरातील सुभाष चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन उपविभागीय पोलिस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानी काही समाजकंटकांनी व माथेफिरूने दगडफेक केली होती. न्यायालयाचा निर्णय आल्यावरही एसटी कर्मचाऱ्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला असताना शरद पवार यांच्या घरावर दगडफेक करण्याचे कारण काय? आजपर्यंत नेत्यांच्या घरावर अशा प्रकारे कृत्य पुरोगामी महाराष्ट्रात कधीच घडलेले नाही. महाराष्ट्राचे लोकनेते असलेले शरद पवार यांच्या घरावर अशा प्रकारचा दगडफेक होणे हे अत्यंत निंदनीय कृत्य असून याचा राष्ट्रवादी काँग्रेस फैजपूर शहर कदापी सहन करणार नाही. या निंदनीय कृत्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. दरम्यान पोलिसांनी या दगडफेकीत मागील करते व करवते कोण याचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.

या निवेदनावर फैजपूर शहराध्यक्ष अन्वर खाटीक, हेमराज चौधरी, शेख कुर्बान शेख करीम, राजू तडवी, शेख जाकीर शेख इमरान, शेख साजिद शेख हमीद, अशोक भालेराव, पप्पू मेढे, ममता आमदेकर, रशिद तडवी, ज्योती वैद्यकर, डॉ. निलेश आमोदेकर यांच्यासह आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content