पिंपरूड येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त पत्रकार व अधिकाऱ्यांचा सत्कार

फैजपूर ता. यावल प्रतिनिधी । येथून जवळ असलेल्या पिंपरूड येथील राहुल कोल्हे मित्र मंडळ यांच्यावतीने राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने शहरातील पत्रकार बांधव व प्रशासन अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी जपूर उपविभागीय अधिकारी कैलास कडलक हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ते म्हणाले की, लोकशाही तील अन्याय कारक – शोषित पीडित दिन – दुबल्याचा चौथा विश्वसनीय आधारस्तंभ म्हणजे पत्रकार असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, राहुल कोल्हे योगेश चौधरी व।मित्र मंडळ चा स्तुत्य उपक्रम आहे या सकारात्मक कार्याचा तरुणांनी आदर्श घ्यावा, येत्या कोरोना तिसऱ्या लाटे ची गंभीर दखल सर्वांनीच घ्यावी, याबाबी पत्रकारांनी वेळोवेळी प्रशासनाच्या सार्वजनिक सूचनांनुसार आपल्या दैनिक न्यूजवर प्रसिद्ध करून जनजागृतीस मोलाचा हातभार लावावा असे आवाहन केले. तहसीलदार महेश पवार, सेवानिवृत्त पोलिस आयुक्त दिलीप सूर्यवंशी,  सपोनि सिद्धेश्वर आखेगावकर, पत्रकार उमाकांत पाटील यांनी समयोचित मनोगत व्यक्त केली.

याप्रसंगी सर्व प्रथम पिंपरुडला पदस्पर्शाने पुनीत करणाऱ्या अनाथांची माय स्व. सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तद्नंतर मराठी पत्रकारिताचे जनक बाळ शास्त्री जांभेकर, युवकांचे जनक स्वामी विवेकानंद व राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या तैलचित्राला  उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विधीवत पूजन करून माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी प्रांताधिकारी कैलास कडलक,तहसीलदार महेश पवार, सेवा निवृत्त पोलिस आयुक्त  दिलीप  सूर्यवंशी, सहा .पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर,पुरवठा अधिकारी राजेंद्र भंगाळे, सभामंच वर स्थानापन्न होती यासर्व मान्यवरांच शाल पुष्पगुच्छ देऊन आदरातिथ्य केले. उपस्थित पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ स्मृतिचिन्ह देवून सन्मानित केले तर आरोग्य दूत सी एच ओ डॉ अतुल वायकोळे,आरोग्य सेविका वैशाली तळेळे, आरोग्य मदतनीस सुषमा पाटील,आशा स्वयंसेवीका शारदा कोळी यांना ही फेसगार्ड मास,पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले यावेळी  प्रांताधिकारी कैलास कडलक ,तहसीलदार महेश पवार व पुरवठा अधिकारी राजेंद्र भंगाळे  यांनी  दिव्यांग बांधवांना प्रतिनिधीक स्वरुपात रेशन कार्ड वितरित केले.

याप्रसंगी पत्रकार अरुण होले, वासुदेव सरोदे, शेखर पटेल, योगेश सोनवणे, समीर तडवी, उमाकांत पाटील, निलेश पाटील, राजेंद्र तायडे, हृतिक  सराफ  आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संजय सराफ यांनी केले आभार योगेश चौधरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहुल कोल्हे, योगेश चौधरी, पराग वारके, विशाल दांडगे, भगवान कोळी आदींनी अथक  परिश्रम घेतले.

Protected Content