जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सुरेश दादा जैन नगर येथील तरुणीची २१ हजाराची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात कुलसुम बी मोहम्मद कदिल शेख वय २१ ही तरुणी वास्तव्यास आहे. कुलसुम बी ही 31 जानेवारी रोजी सायंकाळी साडे सहा वाजता घरी असताना तिच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांक वरून लिंक आली. या लिंक वर क्लिक केले असता कुलसुम बी हिच्या बँकेच्या खात्यातून ऑनलाइन पद्धतीने परस्पर 20 हजार 996 वळवून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कुलसुम बी हिने दुसऱ्या दिवशी बुधवारी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली या तक्रारीवरून लिंक पाठवणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल ओम प्रकाश सोनी हे करीत आहेत.