ग. स. सोसायटीच्या रणधुमाळीस प्रारंभ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गेल्या अनेक महिन्यांपासून उत्सुकता लागून असणार्‍या सरकारी नोकरांच्या सहकारी पतसंस्थेच्या अर्थात ग. स. सोसायटीच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाल्याने याच्या रणधुमाळीस खर्‍या अर्थाने प्रारंभ झाला आहे.

ग.स. सोसायटीचा गत पंचवार्षिकचा कालखंड हा ३१ ऑगस्ट २०२१ रोजी समाप्त झालेला आहे. मात्र कोरोनाच्या आपत्तीमुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. अलीकडच्या काही दिवसांमध्ये कोरोनाचे सावट दूर झाल्याने निवडणुक प्रक्रिया सुरू झाली आहे.

यात ग.स. सोसायटीसाठी जिल्हा उपनिबंधक बिडवई यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने नियुक्ती केलेली आहे. ते २५ मार्च रोजी ग. स. सोसायटीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहेत. त्यानुसार या निवडणुकीसाठी २५ ते ३१ मार्च या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. त्यांची छाननी झाल्यानंतर २८ एप्रिल रोजी या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून ३० एप्रिल रोजी मतमोजणी होवून निकाल घोषित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आल्याने हालचाली गतीमान झाल्या आहेत.

यंदाच्या निवडणुकीत ग.स. सोसायटीत जोरदार लढत होणार असल्याचे संकेत मिळाले असून बहुरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content