सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाम्पत्याचा अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

सातारा (वृत्तसंस्था) सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज स्वातंत्रदिनाच्या दिवशी एका दाम्पत्याने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. सुदैवाने पोलिसांनी वेळीच धाव घेऊन दोघांना अडवल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

 

खाजगी बँकेकडून फसवणूक झाल्याच्या प्रकरणी दखल न घेतल्याने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा दाम्पत्याने प्रयत्न केला. सातारा जिल्ह्यातील दत्तात्रय महाराज कळंबे सहकारी बँकेतील अधिकाऱ्यांनी नलावडे कुटुंबीयांची तब्बल ४१ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे या दाम्पत्याने या प्रकरणाची तक्रार वेळोवेळी पोलीस स्टेशनला तक्रारीसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले. मात्र यावरही काहीच पुढे हालचाल झाली नाही. त्यामुळे आज स्वातंत्र दिनाच्या दिवशी दोघांनी सोबत आणलेली पेट्रोलची कॅन अंगावर ओतून घेतली. परंतू सुदैवाने पोलिसांनी दोघांच्या हातातून कॅन हिसकावून घेतली. त्यामुळे अनर्थ टळला.

 

Protected Content