सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण !

कराड (वृत्तसंस्था) राज्याचे सहकार मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. चिंताजनक म्हणजे, काही दिवसांपूर्वीच बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीला उपस्थितीत होते.

 

 

शुक्रवारी रात्री उशिरा बाळासाहेब पाटील यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना कराडच्या कृष्णा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. बाळासाहेब पाटील याची तब्येत ठीक आहे. त्यांच्यावर व्यवस्थित उपचार सुरू आहेत. याआधी अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा पाच लाखांच्या वर गेला आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठक घेतली होती. त्यावेळी या बैठकीला बाळासाहेब पाटील सुद्धा हजर होते. या बैठकीला जिल्ह्यातील आमदार, पदाधिकारी, शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने हजर होते. दरम्यान, पाटील यांच्या संपर्कात जर कुणी संपर्कात आले असेल, त्यांनी क्वारंटाइन व्हावे किंवा समोर येऊन माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Protected Content