राज्यात दूध दर आंदोलनाला सुरुवात ; हजारो लिटर दूध सोडले रस्त्यावर

कोल्हापूर (वृत्तसंस्था) दूध दरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ठिकठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली आहे. सांगली जिल्ह्यात पुणे-बंगळुरु महामार्गावरील येल्लूर फाट्याजवळ कार्यकर्त्यांनी गोकूळ दूध संघाचा टँकर फोडला असून हजारो लिटर दूध रस्त्यावर सोडले.

 

 

दुध दरवाढ आंदोलन त सहभागी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. गायीच्या दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान मिळावे, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी पहाटेपासूनच आंदोलन सुरू केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाना परिसरातील टिटवे येथे गोकुळ दूध संघाचा टेम्पो अडवून हजारो लिटर दूध कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ओतून दिले. सांगली जिल्ह्यातही एक टँकर अडवून हजारो लिटर दूध रस्त्यावर सोडले. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातून कडेकोट बंदोबस्तात गोकुळचे टँकर मुंबईकडे रवाना झाले. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनास सुरुवात झाली आहे. नगरच्या अकोले तालुक्यातील अनेक गावात आंदोलन केलं जात असून दगडाला दुग्धाभिषेक घालत हमीभाव मिळण्याची मागणी करण्यात येत आहे. तर नाशिकमधील चिंचखेड गावात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी शिवमंदिरात दुग्धाभिषेक घालत आंदोलनास सुरुवात केली.दरम्यान आजच्या राज्य शासनाच्या बैठकीकडे दूध उत्पादकांचे लक्ष आहे.

Protected Content