तरुणाच्या हत्येचा मराठा सेवा संघ व सामाजिक समता संघातर्फे निषेध

 

रावेर, प्रतिनीधी । पिंपळे सौदागर जिल्हा पुणे येथील विराज जगताप या तरुणाची हत्या करण्यात आली असुन,या घटनेचा निषेध रावेर तालुका मराठा सेवा संघ व सामाजिक समता संघ रावेर करण्यात आला आहे. या घटनेबाबत सोशल मीडियात समाजकंटकांकडून मराठा समाजाबद्दल बदनामी करून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्यात येत असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन तहसीलदार, रावेर पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले.

मराठा समाज व समाजातील मुलींवर सोशल मीडियावर अगदी खालच्या पातळीवर टिका-टिप्पणी करण्यात येत आहे. अशा या प्रकारामुळे दोन समाजात जातीय तेढ निर्माण होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु शकतो. म्हणुन अशा समाजविघातक कृत्य करणाऱ्या लोंकाचा तंत्रज्ञानाच्या मदतीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाही करुन गुन्हा दाखल करुन शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखली जावी या आषयाचे निवेदन रावेर तहसिलदार ,व रावेर पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले. निवेदनावर मराठा सेवा संघ तालुक्याधक्ष प्रशांत पाटील,संभाजी ब्रिगेडचे घन:श्याम पाटील, पं.स सदस्य दिपक पाटील, योगेश पाटील, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष निळकंठ चौधरी, सचिन रमेश पाटील, सामाजीक समता मंचचे राजु सवर्णे, नगीनदास ईगंळेसर, उमेश गाढे, महेश तायडे, ललित पाटील, योगेश महाजन, चेतन पाटील, सुधीर पाटील आदींच्या सह्या आहेत.

Protected Content