तरुणाच्या घरासमोरून दुचाकी लांबविली

चाळीसगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील बहाड गावातुन तरुणाच्या घरासमोरून ४० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना रविवार २१ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी दुपारी १ वाजता मेहुनबारे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, विशाल गोकुळ वाघ वय-२८ रा. बहाळ ता. चाळीसगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून मजुरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत असतो. शनिवारी २० एप्रिल रोजी रात्री ९ वाजता त्याने त्याची दुचाकी (एमएच १९ डिके ३१५५) ही त्याच्या घरासमोर पार्किंगला लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री चोरून नेली. दुसऱ्या दिवशी रविवारी २१ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता दुचाकी चोरी झाल्याचे समोर आले. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, परंतु दुचाकी कुठेही मिळून आले नाही. अखेर सोमवारी २२ एप्रिल रोजी मेहुनबारे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल पाटील हे करीत आहे.

Protected Content