प्रवासी महिलेच्या पर्समधून ६० हजाराचे सोन्याचे मंगळसूत्र लांबविले

पाचोरा लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाचोरा बसस्थानक परिसरातून एका महिलेच्या पर्समधून ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना २१ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता घडली. याप्रकारणी सोमवारी दुपारी ३ वाजता पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, रवीना सागर पाटील वय-२१, रा. श्रीकृष्ण गल्ली, पहूर पेठ ता.जामनेर या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला असून कामाच्या निमित्ताने त्या २१ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता पाचोरा बसस्थानक येथे आलेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समधून ६० हजार रुपये किमतीची सोन्याची मंगल होत चोरून नेली. ही घटना उघडतील आल्यानंतर महिलेने सर्वत्र शोध घेतला. परंतु त्यांना सोन्याचे पोत संदर्भात कुठलीही माहिती मिळाली नाही अखेर त्यांनी सोमवारी २२ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content