यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | डोणगाव येथे पंचक्रोशितील प्रसिद्ध ग्रामदैवत श्री खंडोबा महाराजांची यात्रा दि.६ व ७ मार्च रोजी प्रथमच यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन, या निमित्ताने गावातील सर्व मंदीरांना आकर्षक अशी विद्युत रोशनाईने सजवण्यात आले आहे.
या दोन दिवसीय यात्रोत्सवादरम्यान दि.६ रोजी सकाळी ९ वाजता आरती तर रात्री ९ वाजता किसनराव व भिमराव वाघुजी मंडळ मोरदड आणी दहयाणे ता.जि.धुळे यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच दि.७ मार्च रोजी सकाळी ५ वाजता मूर्ती अभिषेक व महाआरती दुपारी ४ वाजता श्री खंडोबा पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे तरी परिसरातील भाविकांनी या यात्रोऊत्सवाच्या निमित्ताने ची खंडोबाच्या दर्शनाचा लाभ व यात्रेत सहभाग घ्यावा असे आवाहन डोणगाव ग्रामस्थांनी केले आहे.
या यात्रोत्सवास यशस्वी करण्यासाठी गावातील आई एकविरा ग्रुप मित्र मंडळ, शिवराजे मित्र मंडळ,छत्रपती शासन ग्रुप,सम्राट ग्रुप, महिला बचत गट,स्वप्नातील डोणगाव ग्रुप, रॉयल फौजी श्री योगेश भाऊ पाटील मित्र परिवार व डोणगाव ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभणार आहे.