अमळनेरातील श्री मंगळग्रह मंदिर भाविकांसाठी खुले ! ( व्हिडीओ )

अमळनेर अमोल पाटील । असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असणारे अमळनेर येथील मंगळग्रह मंदिर आज सकाळपासून भाविकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले आहे. शासनाने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करून संस्थानतर्फे भक्तांच्या दर्शनाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

मार्च महिन्याच्या अखेरीस लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर देवस्थाने देखील बंद करण्यात आली होती. यानंतर राज्य शासनाच्या निर्णयानुसार आज सकाळपासून राज्यातील सर्व मंदिरे व अन्य प्रार्थनास्थळे सुरू करण्यात आली. या अनुषंगाने अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिर देखील खुले करण्यात आले आहे.

आजपासून भाविक येणार या दृष्टीने मंगळग्रह संस्थानतर्फे कालपासूनच चोख नियोजन करण्यात आले होते. येथे येणार्‍या भाविकांचे थर्मल स्क्रीनिंग करून व त्यांना सॅनेटायझर देऊनच आत प्रवेश दिला जात आहे. मंदिराच्या परिसरात भाविकांना मास्क अनिवार्य करण्यात आला असून फिजीकल डिस्टन्सींगचे पालन करण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी भाविक मोठ्या संख्येने मंदिरात दर्शनासाठी येत असल्याचे दिसून आले आहे.

खालील व्हिडीओत पहा मंगळग्रह मंदिराबाबतचा वृत्तांत.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2771982826449468

Protected Content