Home Cities जळगाव रतननाल बाफना यांचे देहावसान

रतननाल बाफना यांचे देहावसान

0
146


जळगाव प्रतिनिधी । येथील ख्यातनाम रतनालाल सी. बाफना ज्वेलर्सचे संस्थापक, शाकाहाराचे प्रणेते तथा समाजसेवक रतनलालजी बाफना यांचे आज निधन झाले आहे.

रतनलालजी बाफना (वय ८६) यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. उपचार सुरू असतांनाच आज दुपारी त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला. त्यांच्या पश्‍चात पत्नी, भाऊ, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. अगदी शून्यातून विश्‍व साकारलेले बाफनाजी यांनी अतिशय सचोटीने आभूषणे विक्रीच्या व्यवसायात लौकीक प्राप्त केला होता. याच्या जोडीला त्यांनी जन्मभर शाकाहाराचा प्रचार-प्रसार केला. अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये भरभरून योगदान देणार्‍या रतनालालजी यांच्या जाण्याने जळगावातील एक महनीय व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.


Protected Content

Play sound