Home Cities जळगाव माजी आ.डॉ.गुरुमुख जगवानी यांनी साजरा केला आनंदोत्सव!

माजी आ.डॉ.गुरुमुख जगवानी यांनी साजरा केला आनंदोत्सव!

0
127

जळगाव, प्रतिनिधी । अयोध्या येथे साकारण्यात येत असलेल्या भव्य श्रीराम मंदिराचा भूमिपूजन सोहळा बुधवारी पार पडला. जळगावात माजी आ.डॉ.गुरुमुख जगवानी यांनी घराजवळ फटाके फोडून आणि पेढे वाटप करीत आनंदोत्सव साजरा केला.

अयोध्याच्या पावन नगरीत प्रभू श्रीरामचंद्रांच्या भव्य मंदिराची स्थापना होणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी श्रीराम मंदिराचा शिलन्यास करण्यात आला. जळगावातील घरी माजी आ.डॉ.गुरुमुख जगवानी यांनी हा आनंदोत्सव जल्लोषात साजरा केला. यावेळी लखीराम जेठाणी, रमेश मतानी, मनोज आहुजा, सौरभ केसवानी, खुशाल शर्मा, जितू ललवानी आदी उपस्थित होते. माजी आ.डॉ.गुरुमुख जगवानी यांच्या संपुर्ण घराला लायटिंग लावण्यात आली होती. सायंकाळी घराबाहेर फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरवत डॉ.जगवानी यांनी आनंद साजरा केला. संपूर्ण परिसर जय श्रीरामच्या घोषणांनी दणाणला होता.


Protected Content

Play sound