जळगावात कासार समाजातर्फे ‘दुर्गा सप्तशती पाठ’चे सामुहिक वाचन

kasar samaj

जळगाव प्रतिनिधी । शहरातील आयोध्यानगर येथील कासार समाज मंगल कार्यालयात नवरात्रोत्सवानिमीत्त सामुहिक श्री. सप्तशती पाठ वाचनाचे आयोजन सो.क्ष. कासार समाजातर्फे आज करण्यात आले होते.

सो. क्ष. कासार समाजातर्फे सण, उत्सवानिमीत्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते. सालाबादाप्रमाणे यंदा देखील नवरात्रोत्सवात दुर्गा मातेची आराधना करण्यासाठी सो.क्ष.कासार समाजासेवा संघातर्फे आज (दि.6) सकाळी 9 वाजता शहरातील आयोध्यानगरातील कासार समाज मंगल कार्यालयात सामुहिक श्री. सप्तशती पाठ वाचनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात परिसरातील महिलांनी प्रचंड संख्येने सहभाग घेत. श्री. दुर्गा सप्तशती पाठाचे वाचन करुन देवीची आराधना केली.

त्यानंतर महापौर सीमा भोळे यांच्या हस्ते कालिंका मातेच्या मंदिरात महाआरती करण्यात आली. यावेळी त्यांनी देशात सर्वत्र सुख शांती नांदो असे देवीला साकडे घातले. तसेच लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक असून प्रत्येक मतदाराने मतदान करुन आपला हक्क बजावून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन भोळे यांनी यावेळी केले. यानंतर उपस्थितांना प्रसाद वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांसह समाजबांधव मोठया संख्येने उपस्थित होते. यशस्वितेसाठी कासार समाजातील समाजबांधवांनी अथक परिश्रम घेतले.

Protected Content