पहूर जि.प. केंद्र शाळेसह संतोषीमाता नगर शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात

पहूर, ता. जामनेर–लाईव्ह ट्रेंडस न्यूज वार्ताहर – येथे केंद्रीय जिल्हा परिषद शाळा तसेच संतोषी माता नगर जिल्हा परिषद शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा उत्साहात पार पडला.

केंद्र जिल्हा परिषद शाळा पहूर तसेच संतोषीमातानगर जिल्हा परिषद शाळेत मोठ्या उत्साहात आज शाळेत विद्यार्थ्यांचे ‘पहिले पाऊल’ अंतर्गत शाळा पूर्वतयारी मेळावा पार पडला. पहूर शहरातील सर्व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनीचे पुष्पगुच्छ आणि शालेय क्रमिक पुस्तके देऊन मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने विद्यार्थी विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती
संतोषीमाता जिल्हा परिषद शाळेत ‘शाळा पूर्वतयारी’ कार्यक्रमाचे अध्यक्ष जळगाव जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती तथा संजय गांधी निराधार समितीचे तालुकाध्यक्ष प्रदीप लोढा, जामनेर तालुका शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेश पांढरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबतच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा विद्याताई क्षिरसागर, शा. व्य.समिती सदस्य प्रवीण लहासे, लक्ष्‍मीबाई वानखेडे, यांच्यासह अन्य सदस्य आणि पालक उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी विद्यार्थिनीचे पुष्पगुच्छ आणि क्रमिक शालेय पुस्तके देऊन स्वागत करण्यात येऊन प्रदीप लोढा यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन शिक्षक दिनेश गाढे यांनी तर आभार मुख्याध्यापिका सुवर्णा मोरे यांनी मानले.

यावेळी उपशिक्षिका चित्रलेखा राजपूत, रत्नमाला काथार, मनीषा राऊत, यांच्यासह पालक व विद्यार्थी व नागरिक, रामेश्वर पाटील, शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेश पांढरे, एड. एस.आर.पाटील, माजी उपसरपंच रवींद्र मोरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भैय्या मोरे, मुख्याध्यापक रवींद्र खोडपे, शिक्षक गणेश राऊत, मिलिंद लोखंडे, स्वप्नील महाजन, अंगणवाडी सेविका सुषमा चव्हाण, विद्या कुमावत यांच्यासह पालक विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!