जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ख्यातनाम राम टोटल बॉडी चेकअपचे संचालक डॉ. प्रभू व्यास यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली आहे.
अहमदाबाद , जळगाव,मुंबई येथील राम टोटल बॉडी चेक अप चे संचालक डॉ प्रभू व्यास यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली .डॉ प्रभू व्यास यांनी बेंगलोर येथून युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन चे एम.एस, व पोस्ट ग्रेज्युएट डिप्लोमा उत्तीर्ण केला असून त्यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ चे पोस्ट ग्रेज्यूएट डिप्लोमा इन सायकॉलॉजीकल गाईडंस व कौन्सिलिंग पण उत्तीर्ण केले आहे.
डॉ. प्रभू व्यास यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये सहभाग घेतला व रीसर्च पेपर प्रेझेन्ट केले आहेत. पती-पत्नी चे दामत्य जीवन, वैवाहिक जीवन व संततीप्राप्ती साठी त्यांनी चिकित्सा पध्दती विकसित केली आहे. त्यांनी त्या आधी क्लिनिकल पॅथॉलॉजी , हाफकिन इन्स्टिट्युट परळ आदींसह भायखळा चे मसीना हॉस्पीटल, सी पी टेंक चे कोठारी हॉस्पीटल , व्ही. टी. सी. एस .टी . कामा अँड अँब्लेस हॉस्पीटल ताडदेव चे दी. भाटीया जनरल हॉस्पीटल येथे अनेक वर्ष सेवा केली आहेत.
डॉ. प्रभू व्यास हे जळगाव ज्युनिअर चेंबर चे माजी अध्यक्ष तसेच रोटरी मेडिकल कमीटी चे माजी चेअरमन आहेत. त्यांनी विविध मधुमेह तपासणी शिबिर , हिमोग्लोबीन तपासणी शिबिर, कोलेस्टेरॉल , लिपिड प्रोफाईल, हृदयरोग तपासणी , डोळे तपासणी शिबिर आरोग्य तपासणी शिबिर ,रक्तदान शिबिर इत्यादी आयोजीत केले आहेत. लक्षणीय बाब म्हणजे त्यांनी १२२ वेळा रक्तदान केले आहे.
डॉ. व्यास यांना याआधी अनेक पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे. आता त्यांनी पीएच.डी. मिळाली असून या यशाबद्दल, नानावटी सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल चे डॉ राज ब्रम्हभट,नागपूरचे डॉ संजय देशपांडे, हैदराबादचे डॉ रामन्ना,यांनी अभिनंदन केले त्यांना सुप्रसिध्द हेड, रीडर , गाईड , डॉ रमेश पोतदार यांचे मार्गदर्शन मिळाले.