जामनेर तालुक्यातील २९ गावात २०२० शेततळे बांधणार

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वाघुर प्रकल्पाच्या जामनेर तालुक्यातील २९ गांवातील लाभक्षेत्रामध्ये एकुण २०२० शेततळे बांधणे प्रस्तावित असून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आज जलसंपदा विभाग व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेततळे उभारणे या बाबतची बैठक संपन्न झाली.

वाघुर प्रकल्पाच्या जामनेर तालुक्यातील २९ गांवातील लाभक्षेत्रामध्ये, जलसंपदा विभाग व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एकुण २०२० शेततळे बांधणे प्रस्तावित आहेत. याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आज वाघुर उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात जलसंपदा विभाग व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेततळे उभारणे बाबतची बैठक संपन्न झाली. यावेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता य.का. भदाणे, कृषी विभागाचे संभाजी ठाकुर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, वाघुर प्रकल्पाचे अभियंता विनोद पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते.

वाघुर प्रकल्पाच्या सातव्या सुधारीत प्रशासकीय मान्यता अहवाला नुसार जामनेर तालुक्यातील वाघुर प्रकल्पाच्या 29 गांवातील लाभक्षेत्रामध्ये, जलसंपदा विभाग व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एकुण 2020 शेततळे बांधणे प्रस्तावित आहेत. शेततळे तयार करणे व शेततळ्यातुन सुक्ष्म सिंचन, पाणी वापराबाबत शेतक-यांसोबत करार करण्याची कार्यवाही प्रगतीत आहे.

सदरची कामे चालु वर्षात सुरु करण्याचे नियोजन आहे.शेततळ्याच्या माध्यमातुन शेतक-यांना हवे त्यावेळी पाणी मिळणार आहे. त्यामुळे शेतीउत्पादन वाढीस मदत होईल; तसेच शेततळ्यामध्ये मत्सउत्पादन, शेततळ्याच्या बांधावर फलवृक्ष लागवड व सौर ऊर्जा निर्मीती अशा विविध बांबीचा अंतर्भाव करुन शेतक-यांची आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी मदत होणार आहे.

भविष्यातील पाण्याचा काटकसरीने वापर होण्यासाठी या भागात सुक्ष्म सिंचनाला चालना देण्याचे नियोजन आहे. शेतक-यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी १०,१०० हेक्टरवर राज्यात प्रथमच प्रायोगिक तत्वावर शेततळे उभारण्याचे नियोजन आहे.

साधारण ५ हेक्टर क्षेत्रात १ शेततळे (१६ गुंठे आकाराचे) त्यामध्ये २७ लक्ष लिटर पाणीसाठा व तो दर २५ दिवसांनी शेतक-यांच्या मागणीप्रमाणे शेततळे भरुन देण्याचे नियोजन राहणार आहे. अशी माहिती जलसंपदा विभागाच्या अधिका-यांनी जिल्हाधिकारी यांना दिली.

Protected Content