डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील बाधीत शिकावू डॉक्टरचा पार्टीत सहभाग

जळगाव प्रतिनिधी । डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील शिकावू डॉक्टरला कोरोनाची बाधा झाली असून तो नुकताच एका पार्टीत सहभागी झाल्याची माहिती समोर आल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्यांना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.

याबाबत वृत्त असे की, जिल्हा रूग्णालयास कोविड रूग्णालयातमध्ये परिवर्तीत करण्यात आले आहे. यामुळे डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयास जिल्हा रूग्णालयात परिवर्तीत करण्यात आले आहे. येथील एक प्रशिक्षणार्थी डॉक्टर हा कोरोना बाधीत महिलेच्या संपर्कात आला होता. कालच त्याच्या चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यामुळे त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

दरम्यान, संबंधीत प्रशिक्षणार्थी डॉक्टर हा कोरोना पॉझिटीव्ह होण्याआधी रविवारी डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात झालेल्या एका पार्टीत सहभागी झाला होता. यामुळे आता पार्टीत सहभागी झालेल्यांना संसर्ग झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. त्या सर्वांची चाचणी करण्यात येणार आहे. तर या डॉक्टरच्या संपर्कात आलेल्यांना आता क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

Protected Content