कोरोना उपाययोजनांचे राजकारण रावेरात तापले (व्हिडीओ)

रावेर प्रतिनिधी । येथील ग्रामीण रग्णालयात कोरोना उपाययोजना व ड्यूरो सिलेंडर व्यवस्थेवरून राजकारण चांगलेच तापले आहे. मान-पानावरुन सुरु झालेले  विषय आरोप-प्रत्यारोपापर्यंत पोहचले आहे.

लोकसहभागातुन ड्यूरो ओक्सिजन सिलेंडर बसविणार होते.तर आमदार निधीमध्ये सात लाखाचा खर्च कश्यासाठी प्रस्तावित केला असा प्रश्न भाजपाने विचारला आहे. संदर्भात भाजपाने आज कृषी उपन्न बाजार समितीमध्ये पत्रकार परिषद घेतली

या बैठकीला जिल्हा परीषद सदस्य नंदकिशोर महाजन,  भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन , भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, पंचायत समिती सदस्य जुम्मा तडवी ,  भाजपा शहराध्यक्ष दिलीप पाटील , भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष महेंद्र पाटील , भाजपा सरचिटणीस वासुदेव नरवाडे ,  नगरसेवक यशवंत दलाल , संदीप सावेळे , हरलाल कोळी आदी भाजपा कार्यकर्ते , पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

रावेर ग्रामीण रुग्णालयात लोकसहभागात ड्यूरो सिलेंडर बसविले तर आमदार निधीतुन यावर सात लाख रुपये प्रस्तावित का केले असा प्रश्न जिल्हा परिषद सदस्य नंदकिशोर महाजन यांनी विचारला

 

 

ड्यूरो सिलेंडरसाठी सर्वांनी निधी दिला आहे.याचे लोकार्पण  एखाद्या पेशंटच्या हस्ते करायला हव होते तहसीलदार यांनी फक्त आमदार यांना बोलावून उदघाटन करून घेतले. सर्वांना विस्वासात घ्यायला हव असी भावना भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर यांनी व्यक्त केली

 

 

रावेर ग्रामीण रुग्णालयात ड्यूरो सिलेंडर बसविण्यासाठी निधी देणाऱ्या विविध सामाजिक संस्थानकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केले व थेट आमदार साहेब यांना बोलावून उदघाटन करून घेतले यामुळे  नाराजी वाढली असल्याचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन यांनी व्यक्त केली

 

 

कोरोनाकाळात आम्ही २४ तास काम करतोय परंतु सत्ताधारी मात्र ग्रामीण रग्णालयात येऊनसुध्दा पाहत नाहीत  मागील वर्षी खर्च केलेले ५० लाखाची माहिती जनतेला देण्याची मागणी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी केली आहे

Protected Content