महाराष्ट्र सुवर्णकार सेनेतर्फे सर्व शाखीय परिचय मेळावा (व्हिडिओ)

rajumama.00 00 41 00.Still059

जळगाव, प्रतिनिधी | महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव जिल्हा जळगाव यांच्या वतीने समाजभूषण श्री धर्मराज गोविंदशेठ विसपुते (चाळीसगावकर) नगर शिवतीर्थ मैदानात रविवार १९ जानेवारी रोजी सोनार समाजाचा सर्व शाखीय वधू-वर व पालक यांचा परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. यात विविध राज्यातील उपवर-वधु यांनी हजेरी लावली होती.

‘ऋणानुबंध’ वधू-वर मेळाव्याचे उद्घाटन आमदार राजूमामा भोळे, धर्मराज गोविंद शेठ विसपुते (चाळीसगावकर) व नगरसेविका तथा प्रभाग समिती सभापती रंजना वानखेडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मेळावा प्रमुख इच्छाराम दाभाडे, उपप्रमुख दीपक जाधव मेळावा सचिव प्रशांत विसपुते यांच्यासह नंदू बागुल योगेश भामरे आमदार राजीव आवळे माजी नगरसेविका लता मोरे उद्योजक रमेश वाघ यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गणेश व संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगावचे अध्यक्ष संजय बाबुराव शेठ विसपुते यांनी सेनेच्या संस्थेने पाच वर्षापुर्वी समितीने ना नफा ना तोटा या तत्त्वावर, समाजाचा पैसा वेळ, अनाठाई खर्च वाचावा या उद्दिष्टाने कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्याचे निश्चित केले. यावेळी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात राज्यातून समाजातील अकराशे उपवर-वधू निनावे नोंदणी केली त्यासूचीचे अनावरण यश सुनील विसपुते यांच्याहस्ते करण्यात आले. या मेळाव्यात नोंदणीकृत ६५८ उपवर- वधू यांनी पालकांसह स्वतःचा परिचय करून दिला. दरम्यान, सुवर्णकार महिला मंडळाने भगिनीसाठी हळदीकुंकू व सौभाग्यवाण लुटण्याचा कार्यक्रम आयोजित होता. स्त्री रोग तज्ञ डॉ. पुनम दुसाने यांनी त्याचे उद्घाटन केले. मेळाव्याचे प्रमुख विशीष्ट म्हणजे सत्कार सोहळा, भाषण ठेवण्यात आले नव्हते. प्रवेश निशुल्क होता. यशस्वीतेसाठी महाराष्ट्र सुवर्णकार सेना अध्यक्ष संजय विसपुते, उपाध्यक्ष अरुण वडनेरे, विजय वानखेडे, सचिव राजेंद्र विसपुते, संजय पगार, मेळावा स्वागताध्यक्ष इच्छाराम दाभाडे, मेळावा उपप्रमुख दीपक जाधव, मेळावा सचिव प्रशांत विसपुते, मेळावा सचिव शशिकांत जाधव, नियोजन समिती प्रमुख योगेश भामरे, मेळवा प्रसिद्धीप्रमुख रत्नाकर दुसाने, महाराष्ट्र सुवर्णकार सेनेची कार्यकारिणी सदस्य उत्तमराव नेरकर, नंदू बागुल, गोकुळ सोनार, दीपक जगदाळे, सुरेश सोनार, धनराज जाधव, नितीन गंगापुरकर, सुभाष सोनार, भगवान दुसाने, सुधीर भामरे, नितीन विसपुते, दिलीप पिंगळे, राजेंद्र दुसाने, नरेंद्र सोनार, पंकज बागुल, नितीन बिरारी, चेतन सोनार, संजय भामरे, अभिजीत थोरात, तसेच मेळावा सदस्य सचिन सोनार, मनोज सोनार, बबलू बाविस्कर, विशाल विसपुते, संजय पिंगळे, संदीप सोनार, श्याम भामरे, विनोद विसपुते, विनोद दंडगव्हाळ, उमेश सोनार, रमेश वाघ, शरदचंद्र रणधीर, विश्‍वनाथ जाधव, पंकज रणधीर यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन एड. केतन सोनार राजश्री रविराज पगार यांनी केले. तर प्रशांत विसपुते व रत्नाकर दुसाने यांनी आभार मानले.

Protected Content