डॉ.आचार्य विद्यालयात रंगले कथाकथन

 

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात मराठी राज भाषा दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी कथाकथनाचे आयोजन करण्यात आले. 

विद्यार्थ्यांना नवीन शब्दांची ओळख व्हावी,शब्दसंपत्ती वाढावी,भाषेची गोडी लागावी ,पुस्तकांचा शोध घेऊन वाचन वाढवणे या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना शक्ती वापरून रंजकतेने कथा सादर केल्या. शिक्षकांनी देखील गोष्टी सादर केल्या. तसेच संपूर्ण सप्ताहात इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ सांगणे, कल्पनाविस्तार करणे, संवाद लेखन सादर करणे, शाब्दिक खेळ आदी माहिती दिली गेली.  या कृतीत मुलांनी सहभाग घेतला. प्रसाद कुलकर्णी, तनिष्का वाघ, रोशन काकडे, ज्ञानेश्वरी महाजन, योजित ठाकूर, आराध्य भंगाळे, अथर्व बोबडे, मानसी वानखेडकर, मानसी वाणी, पार्थ झोपे, पद्यमनाभ पोळ यांनी गौतम बुद्ध व भिकारी, गर्वाचे घर खाली, कावळा व हरीण,चिऊताईची पिल्ले, वाघोबाची दाढी, परोपकार, लांडगा व वासरू,राजकन्या आदी कथा सादर केल्यात. कार्यक्रमाची संकल्पना मुख्याध्यापिका योगिता शिंपी यांची होती. कार्यक्रम प्रमुख म्हणून सीमा पाटील व वंदना सावदेकर यांनी काम पाहिले. 

 

Protected Content