आचारसंहितामुळे रावेरचा लोकशाही दिन रद्द

 

रावेर, प्रतिनिधी । मार्चमध्ये कोरोना व्हायसरचा प्रभाव वाढल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. याकालावाधित सर्वसाधारण जनतेचा हक्काची दिवस असलेला लोकशाही दिन बंद होता. आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्याने जिल्हाधिकारी यांनी या महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्याचा आदेश दिला होता. परंतु आचारसंहितामुळे  लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे.

मार्चपासुन कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढल्याने शासनाने लॉकडाऊन जाहीर केले होते. या कालावधीत लोकशाही दिन आयोजित केला जात नव्हता परंतु, या महिन्यात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सर्व तहसिलदार यांना तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिन व्हीडीओ क्रॉनफ्ररसद्वारे आयोजित करण्याचे आदेश होते. परंतु, ग्राम पंचायत निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाला असल्याने आचारसंहिता लागल्याने यंदाच्या हंगामातील लोकशाही दिन रद्द करण्यात आला असल्याची माहिती प्रांतधिकारी कैलास कडलक यांनी लाइव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलतांना सांगितले. लोकशाही दिन रद्द झाल्याने लोकशाही दिनात तक्रार करू इच्छणा-यांमध्ये प्रचंड निराशा पसरलेली आहे. ग्राम पंचायतीची आचारसंहिता संपल्यावरच सर्वसाधारण जनतेसाठी लोकशाही दिन आयोजित केला जाणार आहे.

Protected Content