जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात प्राथमिक विभागात उत्पादक उत्पादन प्रकल्पा अंतर्गत बी रोपण करणे हा उपक्रम राबविण्यात आला.
डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात प्राथमिक विभागात पाहिले ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी भेंडी, वांगे, मिरची, टोमॅटो, पालक, कोबी, गिलके, दोडके, वाल, वाटाणे, काकडी, शेपू, आंबट चुका, गवार आदी बियांचे रोपण केले. ट्रेमध्ये कोको पीठ टाकून बियांचे रोपण करण्यात आले. शाळेतच या बियांची निरीक्षण व रोपांची देखभाल विद्यार्थीच करणार आहेत. बियांची लागवड कशी होते, रोप कशी वाढतात, हे विद्यार्थ्यांना कळावे हा या प्रकल्पाचा हेतू होता. शाळेच्या मुख्याध्यापिका योगिता शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला. उपक्रम प्रमुख म्हणून सुनील वाघ व छोटू पाटील यांनी काम पाहिले, तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी सहकार्य केले.