दर्जी फाऊंडेशनच्या वतीने ‘ऑफीसर टॉक शो’चे आयोजन

Darji Foundation

जळगाव प्रतिनिधी । दर्जी फाऊंडेशनच्या वतीने जळगाव शहरात प्रथमच दहावी आणि बारावीच्या परिक्षा दिलेल्या किंवा उत्तीर्ण विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी ‘ऑफीसर टॉक शो’ अर्थात प्रश्न तुमचे उत्तर आमचे या माध्यमातून सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा एकमेव कार्यक्रमाचे आयोजन 7 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता शहरातील छत्रपती संभाजी राजे नाट्य मंदीर महाबळ रोड येथे घेण्यात येणार आहे.

प्रशासकीय अधिकाऱ्यांची राहणार उपस्थिती
या कार्यक्रमास अप्पर पोलीस अधीक्षक लोहित मतानी, कमी वयात उपजिल्हाधिकारी पदावर निवड झालेले पूजा गायकवाड (पुणे), हिरालाल चौधरी (आरएफओ) आणि करीअरतज्ञ गोपाल दर्जी हे मार्गदर्शक उपस्थित राहणार आहेत. मुलांच्या करियरची काळजी दूर व्हावी आणि त्यांना योग्य शिक्षणाचा मार्ग निवडता यावा, यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. प्रशासकीय अधिकारी आणि त्यांच्या यशाचे रहस्य त्यांचे समग्र आत्मकथन एकण्याची मोठी संधी फक्त आणि फक्त एकदाच मिळणार आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचा होणार सत्कार
सोबतच यूपीएससी आणि एमपीएससी यांसह इतर स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांसह पालकांचा सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. असा भव्यदिव्य कार्यक्रम महत्वपूर्ण असून विद्यार्थ्यांच्या करिअरला योग्य वळण मिळणार आहे. तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहण्याचे आवाहन दर्जी फाऊंडेशनच्या वतीने केले आहे. कार्यक्रमात उपस्थितीतसाठी नाव नोंदणी आवश्यक असून नाव नोंदणी करण्यासाठी दर्जी फाऊंडेशन 0257-2229095 येथे संपर्क साधावा असे देखील आवाहन केले आहे.

Add Comment

Protected Content