शिरसोली येथील अल्पवयीन मुलाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने राहत्या घरात दुपारी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथील इंदिरा नगरात राहणारा विपीन रामकृष्ण मोरे (वय-१६) आईवडील, ४ भांवासोबत राहतो. आज सकाळपासून आईवडील शेतात तर भाऊ हा कामाच्या निमित्ताने बाहेर पडला होता. घरात एकटा असतांना दुपारी २ वाजेच्या सुमारास विपीन मोरे यांनी घरात छताला दोरीच्या मदतीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. विपीनने आत्महत्या केल्याच समाजताच आईवडील व भावांनी हंबरडा फोडला. पोलीस पाटील कृष्णा बारी यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात रवाना केले आहे. 

Protected Content