लोहारा वनपरिक्षेत्रातील वनसंरक्षक झोपडीवर हल्ला

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील लोहारा वनपरिक्षेत्रात रात्री काही अज्ञातांनी वनसंरक्षक झोपडीवर हल्ला करून कंपार्टमेंट क्रमांक २४ येथील वनविभागाच्या जागेची तोडफोड केल्याची घटना घडली आहे.या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी अजय बावणे यांनी घटनास्थळी भेट देऊन हल्लेखोरांविरुद्ध पोलिस तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

याबाबत वृत्त असे की, वन विभागाच्या लोहारा गावानजिक कंपार्टमेंट नंबर २४ आहे. येथे वन जमीन वृक्ष तोड थांबवण्यासाठी वन विभागाची वन संवरक्षण कुटी असुन येथे २४ तास वनमजूरच्या माध्यमातुन वनसंपदावर वाच ठेवला जातो. दि १५ रोजी रात्री नऊच्या सुमारास वन संवरक्षण कुटी वनमजूर सुपडू पावरा यांची गस्त सुरु असतांना काही अज्ञात लोकांनी वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करण्याच्या उद्दीष्टाने हल्ला केला. यात वन कुटीचे तोडफोड झाली असून सौरदिव्ये चोरीला गेल्याचे वृत्त आहे. या घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल अजय बावने घटनास्थळी भेट देऊन हल्ला करणाऱ्यां विरुध्द पोलिसात तक्रार देण्याच्या सूचना वनपाल यांना दिल्या आहे. तसेच संभाव्य अतक्रमण व वृक्षतोड होण्याचा धोका लक्षात घेऊन लवकरच एसआरपीएफचे जवान वनसंपदाच्या संवरक्षणासाठी तैनात करण्यात येणार आहे. वन संपदा आबाधित ठेवण्याची जबाबदारी सुजान नागरीक म्हणून सर्वांची आहे. कोणी अतिक्रमण करू नका, असे अवाहन वनक्षेत्रपाल अजय बावने यांनी केले आहे.

Protected Content