वृक्षरोपण व संगोपनात निष्काळजीपणा दाखवणाऱ्या मक्तेदारावर कारवाई करा अन्यथा उपोषण करणार

 

यवाल, प्रातिनिधी । वृक्षरोपण व संगोपनात निष्काळजीपणा दाखवणाऱ्या  मक्तेदारावर कारवाई करा अन्यथा उपोषण करणार असल्याचा इशारा उपनगरध्यक्षा रूखमाबाई भालेराव महाजन यांनी मुख्याधिकारी बबन तडवी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे दिला आहे. 

नगर परिषदेतर्फे हरित क्रांती योजनेंतर्गत शहरात वृक्ष लागवडीचा ठेका दिला आहे. मात्र, ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे हिवाळ्यात या रोपांची पाने गळत असल्याचा आरोप करत ठेकेदाराची तत्काळ चौकशी कारवाई तसेच हा ठेका दुसऱ्या योग्य प्रकारे काम करणाऱ्या ठेकेदारास देण्यात यावा अशी मागणी  उपनगरध्यक्षा रूखमाबाई भालेराव महाजन यांनी  केली आहे. याबाबत निवेदनात नमुद करण्यात आहे की, यवाल नगर पालिकेतर्फे यावल शहरात विविध ठिकाणी हरित क्रांती योजनेतून वृक्षारोपणाची प्रत्यश पहाणी केली असता ठेकेदाराकडून निवेदेप्रमाणे जे वृक्ष लागवडीसाठी दिले आहे. ते न लावता दुसरेच वृक्ष लागवड करण्यात आले आहे. तसेच संगोपनासाठी देऊन जबाबदारी सोपवली आहे. मात्र, शहरात काही भागात लावलेली रोपे हिवाळ्यात सुकू लागली आहेत. त्यामुळे पालिकेने खर्च केलेला निधी  वाया जाण्याची शक्यता आहे.  याप्रकरणी सुकलेल्या रोपांचे फोटो  घेऊन उपनगराध्यक्षा भालेराव महाजन यांनी थेट मुख्याधिकारी  बबन तडवी यांच्याकडे तक्रार  केली आहे. याबाबत योग्य चौकशी करून वृक्षरोपण व संगोपनात निष्काळजीपणा दाखवणाऱ्या  संबंधित मक्तेदारावर कारवाईची  मागणी त्यांनी केली आहे. त्याच्यावर कारवाई न केल्यासनगर पालिकेसमोर उपोषणाचा  इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी सामाजीक कार्यकर्ते गणेश महाजन, 

उपस्थित होते.

 

Protected Content