निशिगंधा वाड यांनी गुंफले उमंग व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प

चाळीसगाव प्रतिनिधी । विख्यात अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी आज उमंग व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प गुंफले.

प्रारंभी आमदार उन्मेष पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी चाळीसगाव तालुक्याता सांस्कृतीक व साहित्यीक इतिहाबाबत विवेचन केले. यानंतर डॉ. निशिगंधा वाड यांनी आपल्या व्याख्यानाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्या म्हणाल्या की, सर्व व्यवहारात तणाव आहे मात्र तो प्रेमाने दूर सारा कारण आपली जात ही जन्माने नाही तर जगण्याने सिद्ध होते. त्यांनी भारतीय संस्कृतीची महत्ता विविध उदाहरणांच्या माध्यमातून उलगडून दाखवली.

यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष अशालाता चव्हाण, पंचायत समितीच्या सभापती स्मितल बोरसे, राज्य महिला आयोगाच्या सदस्य देवयानी ठाकरे, नाट्यप्रेमी डॉ. मुकुंद करबळकर, डॉ. पुष्कर घाटे, डॉ. समिधा घाटे, विजय गर्गे, तुषार मुजुमदार, गौरव काळंगे, रवि निकम, आश्‍विन खैरनार, रमेश पोतदार, सुषमा पाटील, प्रा. साधना निकम प्रा. छाया निकम प्रा. पी आर पाटील प्रा.सौ. बोरसे कथ्थक नृत्यांगना कविता बागुल, प्रियंका देवरे, नाट्यकलावंत साहेबराव काळे, संगीत शिक्षक श्रीनिवास मोडक यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन सोनल वाघ तर आभार अमोल चव्हाण यांनी व्यक्त केले.

Add Comment

Protected Content