Home Uncategorized ट्रम्प यांच्या स्वास्थ्यासाठी उपवास करणाऱ्या चाहत्यांचा हृदयविकाराने मृत्यू

ट्रम्प यांच्या स्वास्थ्यासाठी उपवास करणाऱ्या चाहत्यांचा हृदयविकाराने मृत्यू

0
38


मेदक, (तेलंगणा ) : वृत्तसंस्था । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं त्यांच्या एका भारतीय चाहत्यानं उपवासही ठेवले होते. परंतु, दुर्दैवानं या चाहत्याच हृदयविकाराच्या झटक्यानंतर निधन झालंय.

बुस्सा कृष्ण राजू असं या डोनाल्ड ट्रम्प यांच्या भक्ताचं नाव होतं. डोनाल्ड ट्रम्प बाधित आढळल्यानंतर तो तणावाखाली आला होता.कृष्ण राजूनं ट्रम्प यांच्यासाठी उपवासही ठेवलं. चिंतेमुळे त्याला झोपही लागत नव्हती. रविवारी हृदयविकाराच्या धक्क्यानं त्याचा मृत्यू झाला.

गेल्या वर्षी त्यानं ट्रम्प यांची सहा फूट उंच मूर्तीही उभारली होती. तो दररोज डोनाल्ड ट्रम्प यांच्या मूर्तीची पूजाही करत होता. आयुष्यात एकदा तरी डोनाल्ड ट्रम्प यांची प्रत्यक्षात भेट घ्यावी, ही कृष्ण राजूची इच्छा मात्र त्याच्या मृत्यूनंतर अपूर्ण राहिली. कालच ट्रम्प यांनी आपण कोविड १९ संक्रमणातून मुक्त झाल्याची घोषणा केलीय.


Protected Content

Play sound