टाकीतील पाण्याचा वाद; भावाने डोक्यात टाकली लोखंडी हातोडी !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील खंडेराव नगर येथे पाण्याच्या टाकीतील पाणी वाया जात असल्याने ते बंद कर असे सांगितले तर राग आल्याने भावानेच भावाच्या डोक्यात डोक्यात लोखंडी हातोडी मारून दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रविवार 19 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास रामानंदनगर पोलीस ठाण्यात एका जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील खंडेराव नगर येथे मंगलसिंग सुंदरलाल खरारे वय 37 व त्यांचा भाऊ विजय सुंदरलाल खरारे हे दोन्ही राहतात आहेत. रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास खंडेराव नगर परिसरात पाणी पुरवठा झाला होता. यादरम्यान विजय खरारे यांच्या पाण्याच्या टाकीतून पाणी वाया जात असल्याने पाणी बंद करण्याबाबत मंगलसिंग यांनी भाऊ विजय यास सांगितले. याचा राग आल्याने विजयने मंगलसिंग यांच्यासोबत वाद घातला तसेच त्यांना शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी मारहाण करत मंगलसिंग यांच्या डोक्यात लोखंडी हातोडी मारून दुखापत केली तसेच जिवे मारण्याची धमकी विजय याने दिली. याप्रकरणी जखमी मंगलसिंग खरारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांचा भाऊ विजय खरारे यांच्या विरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस नाईक राजेश चव्हाण हे करीत आहेत.

Protected Content