विजेच्या धक्क्याने जखमी झालेल्या मजूराचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कानळदा रोडवर सेंट्रींग काम करतांना ग्रँडरमध्ये उतरलेल्या विजेच्या धक्क्याने मजूर दुसर्‍या मजल्यावरुन खाली कोसळल्याची घटना गुरुवारी १६ फेब्रुवारी रोजी घडली होती. यात गंभीर जखमी झालेल्या संजय रामभाऊ पाटील (वय-४२, रा. गेंदालाल मिल) यांचा उपचार सुरु असतांना रविवारी १९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता प्राणत्योत मालवली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील गेंदालाल मिल परिसरात संजय पाटील हे कुटुंबियांसह वास्तव्यास होते. सेंट्रींग काम करुन ते कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. गुरुवारी दि. १६ रोजी कानळदा रोडवरील के. सी. पार्कजवळ बांधकामाची साईट सुरु असून त्याठिकाणी संजय पाटील हे सेंट्रींग काम करीत होते. ग्रँडरवर काम करीत असतांना ग्रँडरमध्ये उतरलेल्या विजेच्या धक्का लागून संजय पाटील हे दुसर्‍या मजल्यावरुन खाली कोसळले. यात त्यांच्या पोटाला, हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असतांना रविवारी १९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. या घटनेबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content