ज्येष्ठ अभिनेते जगदीप काळाच्या पडद्याआड

मुंबई प्रतिनिधी । ज्येष्ठ अभिनेते जगदीप (वय ८१) यांचे निधन झाले असून त्यांच्या माध्यमातून एक सशक्त विनोदी कलावंत काळाच्या पडद्याआड गेल्याची शोकसंवेदना व्यक्त करण्यात येत आहे.

सैयद इश्तियाक अहमद यांचं वृद्धापकाळानं बुधवारी मुंबईत निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. जगदीप यांनी बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर आपला ठसा उमटवला होता. जगदीप यांचा जन्म. २९ मार्च १९३९ रोजी मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात झाला होता. सैयद इश्तियाक अहमद जाफरी हे जगदीप यांचे खरे नाव. जगदीप अभिनयास सुरुवात बाल कलाकार म्हणुन बी.आर. चोप्रा यांच्या अफसाना या चित्रपटाने केली. बाल कलाकार म्हणून त्यांचे इतर चित्रपट अब दिल्ली दूर नही, मुन्ना व हम पंछी एक डाल के. त्यानंतर बिमल रॉय यांच्या दो बीघा जमीन या चित्रपटाद्वारे विनोदी भूमिकेस सुरूवात केली. त्यांनी ३०० हून अधिक सिनेमांमध्ये काम केले.

शोले सिनेमातील सूरमा भोपाली हे पात्र त्यांनी अगदी जीवंतपणे वठविले. जगदीप यांनी मच्छर इन पुराना मंदीर, अंदाज अपना अपना, फिर वही रात, कुरबानी, शहनशाह यांसारख्या सिनेमांत काम केले आहे. अभिनेता जावेद जाफरी हे त्यांचे पुत्र आहेत. त्यांचा दुसरा पुत्र नावेद जाफरी आहे.

Protected Content