भुसावळात अवैध देशी दारू विक्री करणारा अटकेत

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील भिरूड हॉस्पीटलच्या मागे अवैध देशी दारू विक्री करणार्‍याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत वृत्त असे की, बुधवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास शहरात कृष्णा नगर भिरुड हॉस्पिटलच्या मागे बियाणी शाळेकडे जाणार्‍या रोडावर सार्वजनीक ठिकाणी देशी दारूची अवैध विक्री करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार बाजारपेठ स्थानकाच्या पथकाने अजय बलराम डुगलज (वय -४५ रा.कृष्णा नगर भिरुड हॉस्पिटलच्या मागे भुसावळ ) या व्यक्तीला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे देशी दारूच्या १८० मिलीलिटरच्या २८ बाटल्या आणि ९० मिलीलीटरच्या २६ बाटल्या आढळून आल्या. हा ऐवज जप्त करण्यात आला असून त्याच्या विरूध्द बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई पो.अधिक्षक पंजाबराव उगले, अप्पर पो.अधिक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व पो.नि. दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ स्थानकाचे सपोनि संदिप परदेशी, पो.हे.कॉ सुनिल जोशी, पो.ना रविंद्र बिर्‍हाडे,नेव्हील बाटली, महेश चौधरी, तुषार पाटील, पो.कॉ.कृष्णा देशमुख यांच्या पथकाने केली. या संदर्भात बाजारपेठ पोलीस स्थानकामध्ये पो.कॉ कृष्णा देशमुख यांच्या फिर्यादी वरुन प्रोव्हीश गु.र.न ७०७ / २०२० मु.पो.का.क.६५ ( ई ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा तपास पो.ना रविंद्र बिर्‍हाडे करीत आहेत.

Protected Content