जळगाव प्रतिनिधी । आज दुपारी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात सात रूग्ण पॉझिटीव्ह आले असून यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या ५०८ वर पोहचल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज दुपारी एका प्रेस नोटच्या माध्यमातून कोरोना बाधीतांची माहिती जाहीर केली आहे. यानुसार-भडगाव, धरणगाव, एरंडोल, अमळनेर, यावल, सावदा, भुसावळ येथील 37 अहवाल प्राप्त. 30 अहवाल निगेटिव्ह तर 7 अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती मध्ये अमळनेर 3, भुसावळ 2, एरंडोल व सावदा येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 508 झाली आहे.
अमळनेरात आधी १०० पेक्षा जास्त रूग्णसंख्या झाली होती. मात्र नंतर यातील बहुतांश रूग्ण कोरोनामुक्त झाले होते. तथापि, अलीकडच्या काळात तालुक्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढीस लागल्याचे दिसून येत आहे.