जिल्ह्यात नवीन ११६ कोराना बाधित रूग्ण ; जळगाव, चोपडा, पारोळ्यात संसर्ग वाढला

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार आज चिंता व्यक्त करणारी बाब म्हणजे तब्बल ११६ रूग्ण कोवीड पॉझिटीव्ह आढळून आल्याने जिल्ह्यात अत्यंत भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. आढळून आलेल्या रूग्णांमध्ये जळगावात २४, चोपडा २१, पारोळा १४, एरंडोल १० प्रमाणे समावेश आहे. एकुण १२८१ रूग्ण कोरोनाबाधितांची संख्या झाली आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून कोरोना बाधितांबाबत माहिती जाहीर केली आहे. जळगाव शहर २४, भुसावळ ५, अमळनेर ३, चोपडा २१, पाचोरा १, भडगाव १, धरणगाव ८, यावल ७, एरंडोल १०, जामनेर ९, जळगाव ग्रामीण ३, रावेर १, पारोळा १४, मुक्ताईनगर ३, बोदवड ६ असे एकुण ११६ रूग्ण कोरोना बाधित आढळले आहे.

एरंडोलात एकाच कुटुंबातील ८ जण कोरोनाबाधित
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ३० वर्षीय महिला, ९ वर्षाचा मुलगा, १९ वर्षीय नवयुवक, १७ वर्षीय नवयुवक, १३ वर्षाचा मुलगा, ४५ वर्षीय पुरुष, ३६ वर्षीय महिला, १५ वर्षीय मुलगी, यांचा समावेश आहे. तसेच एरंडोल तालुक्यात ग्रामीण भागात उतरान येथे ०२ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची माहिती देण्यात आली. याप्रमाणे नव्याने एकूण १० पॉझिटिव्ह रुग्ण संख्या आहे. शहरात एकाच कुटुंबातील १२ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, त्यात गांधीपुरा एरंडोल ०२ ग्रामीण रुग्णालय सिस्टर ०१ , व उत्राण ०४. याप्रमाणे १९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मंगळवारी २९ स्वॅब च्या अहवालात १० रुग्ण पॉझिटिव्ह असल्यामुळे तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या २९ वर पोहोचले आहे त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. या वृत्ताला प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी दुजोरा दिला आहे.

चोपडा तालुक्यात २० पॉझिटीव्ह
चोपडा येथील प्राप्त ५३ अहवालात ३३ निगेटिव्ह तर २० पॉझिटिव्ह अहवाल आले आहे. चोपडा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या ९४ झाली आहे. त्यात आज पटवे अळी ८, सहयोग कॉलनी ४, शिंदे वाडा ३, मेन रोड वरील किराणा दुकानात काम करणारे ३ जण, भाई कोतवाल रोड १, पाटील गढी खाई वाडा भागातील १ असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप लासूरकर यांनी दिली.

धरणगाव शहरात आठ कोरोना रूग्ण आढळले
आज सायंकाळी तपासणी अहवाल प्रशासनाला आठ रूग्ण बाधित आल्याचे आढळून आले आहे. आढळून आलेले रूग्ण शहरातील चिंतामण मोरया परिसर आणि मराठे गल्लीतील आहेत. सोमवारी रात्री उशीरापर्यंत तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४३ पर्यंत होती आज त्यात आठ रूग्णांची भर पडली असून एकुण आकडा ५१ वर पोहचली आहे.

लॉकडाऊनचे पालन करण्याचे आवाहन
शासनाच्या नियमांचे नागरीकांनी पालन करणे गरजेचे आहे. जरी लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली असली तरी नागरिकांनी कोरोना विषाणूपासून स्वत:ची व कुटुंबियांची काळजी घेणे गरजेचे आहे. विनाकारण बाहेर फिरणे आतातरी टाळा, घरातच सुरक्षित रहा असे जिल्हा प्रशासन वारंवार आवाहन करत आहे.
जिल्हा प्रशासन व पालिका प्रशासन खबरदारी घेत आहे. मात्र नागरिक याकडे गंभीरपणे बघत नसल्याने जिल्ह्याच्या दृष्टीने चिंता व्यक्त होत आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केली आहे.

Protected Content