एकाची दुचाकी लांबवली; अज्ञात चोट्यांवर गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील श्रीनिवास कॉलनीतून एकाची १५ हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, विनोद पितांबर पाटील वय 48 राहणार गुरुदत्त कॉलनी समर्थ केंद्राजवळ गणेश कॉलनी, जळगाव हे आपल्या कुटुंबीयांचा वास्तव्याला आहे. गुरुवार 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ते शहरातील श्रीनिवास कॉलनी येथे कामाच्या निमित्ताने दुचाकी (एमएच 19 सीएल 5341) वर आले होते. त्यांनी टपरीजवळ दुचाकी पार्क करून कामानिमित्त निघून गेले. दरम्यान आज्ञात चोरट्यांनी 15 हजार रुपये किमतीची दुचाकी करण्यात चोरून नेली. त्यांनी सर्वत्र परिसरात शोधा शोध केला.

परंतु दुचाकी कुठेही आढळून आले नाही, अखेर त्यांनी शुक्रवार ५ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोज पवार करीत आहे.

Protected Content