स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवास श्री. गो. से. हायस्कूलमध्ये “हर घर तिरंगा” रॅलीने प्रारंभ

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |   शहरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने श्री. गो. से. हायस्कूलतर्फे  “हर घर तिरंगा” रॅलीचे आयोजन करण्यात आले.

 

आज शनिवार दि.  ६ ऑगस्ट रोजी  पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी “हर घर तिरंगा” चा नारा देत   रॅली काढली. यावेळी प्रत्येक भारतीयाने स्वतःच्या घरावर “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव” प्रसंगी तिरंगा फडकविण्याचे आवाहन करण्यात आले.  रॅलीची सुरुवात मुख्याध्यापिका प्रमिला वाघ यांनी विद्यार्थ्यांना विविध सूचना देऊन गो. से. हायस्कूल येथून केली. याप्रसंगी पर्यवेक्षक आर. एल. पाटील,  एन. आर. ठाकरे, ए. बी. अहिरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख आर. बी. तडवी,  शिक्षिका सी. एल. जाधव,  ए. व्ही. पाटील,  एम. आर. सोमवंशी, स्मिता सोनवणे उपस्थित होते.  रॅली यशस्वीतेसाठी एम. जे. चिंचोले, एल. टी. पाटील, एम. आर. देवरे, स्वप्निल जाधव, सिद्धांत जगताप यांनी सहकार्य केले.  रॅलीची सुरुवात गो.. से. हायस्कूलपासून पुनगाव रोड मार्गे रिंग रोड, छत्रपती संभाजी महाराज चौक, कृषी उत्पन्न बाजार समिती मार्गे येऊन पुन्हा गो. से. हायस्कूल येथे विसर्जित करण्यात आली.

Protected Content