जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आजही कोवीड रूग्णांची दिलासादायक आकडेवारी प्राप्त झाली आहे. आज आलेल्या अहवालात जिल्ह्यात एकुण १४६ रूग्ण आढळून आले. तर २३६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जळगाव शहरासह भुसावळ तालुक्यातील कोरोनाचे रूग्ण वाढलेले दिसून येत आहे.
आजची आकडेवारी
जळगाव शहर -४२, जळगाव ग्रामीण-३, भुसावळ-४१, अमळनेर-९, चोपडा-७, पाचोरा-८, भडगाव-४, धरणगाव-३, यावल-३, एरंडोल-०, जामनेर-५, रावेर-१, पारोळा-१, चाळीसगाव-१२, मुक्ताईनगर-३, बोदवड-० आणि अन्य जिल्हा ४ असे एकुण १४६ रूग्ण आज आढळून आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस कमी होत असल्याने जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे. रिकव्हरीचा रेट हा ९३.०३ टक्क्यांपर्यंत आला आहे. जिल्ह्यात एकुण ५१ हजार ४५० रूग्ण आढळून आले असून ४७ हजार ८६२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज ३ रूग्णांचा मृत्यू झाला. एकुण जिल्ह्यात १२३३ रूग्णांची मृत्यूचा आकडा पोहचला आहे. तर जिल्ह्यात आता २ हजार ३५५ रूग्ण कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.