Home क्राईम शेतातील विहिरीतून पाण्याच्या मोटारीची चोरी

शेतातील विहिरीतून पाण्याच्या मोटारीची चोरी

0
47


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील कल्याणे बुद्रुक येथील शिवारातून विहिरीतील पाण्याची मोटर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात गुरुवारी १२ जानेवारी दुपारी १ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुहास रमेशचंद्र धुप्पड (वय-५१) रा. दांडेकर नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात त्यांचे कल्याणे बुद्रुक शिवारात शेत असून शेतातील विहिरीत पाण्याचे मोटार लावलेली आहे. गुरूवार ११ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपासून ते १२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी विहिरीत असलेली पाण्याची मोटार चोरून येण्याची उघडकीला आली आहे. याबाबत सुहास धुप्पड याने धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात दुपारी १ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound