प्रिया पाटीलची गगनभरारी : थाळी-गोळा फेक स्पर्धेत पटकावले ‘सिल्व्हर मेडल’ !

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील गाळण येथील प्रिया शंकर पाटील ही युवती गतीमंद आणि अस्थिवांग असून देखील तिने जिद्दीने धाडस करत दिल्ली येथे जवाहरलाल नेहरू स्टेडियम मध्ये आयोजित स्पर्धेत थाळी फेक व गोळा फेक या खेळांमध्ये “सिल्वर पदक” मिळून महाराष्ट्राचे व जळगाव जिल्हाचे नाव लौकिक केले आहे.

एशियन ट्रक आणि टुरप फेडरेशन इंडिया आयोजित दिल्ली येथे ५ वी नॅशनल दिव्यंजन गेम्स – २०२३ या स्पर्धेत सिल्वर पदक घेऊन प्रिया ने महाराष्ट्र व जळगाव जिल्हाचे नाव लौकिक केले आहे. अतिशय आनंदाची व अभिमानाची बाब ठरत आहे की, कुमारी प्रिया हीचे, जळगाव जिल्ह्यातून एकमेव दिव्यांग स्पर्धक, दिव्यांग वर्गात, दिल्ली येथील राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेसाठी निवड झाली होती. दि. ६ व ७ जानेवारी रोजी दिल्ली येथे जवाहर नेहरू स्टेडियम मध्ये गोळा व थाळी या स्पर्धेत सिल्वर पदक घेऊन दुसरा क्रमांक पडकवला. स्पर्धेत विजयी होऊन नाशिक चे प्रशिक्षक खंडू कोटकर याच्या मार्गदर्शनामुळे आज प्रिया दिव्यांगाजन नॅशनल स्पर्धेत प्रियाने यश संपादन केले आहे. प्रियाची आई मनीषा पाटील यांनी धाडस दाखवत प्रिया हिस खेळा संदर्भात परावृत्त केले. प्रियाला गोळा थाळी खेळात योग्य मार्गदर्शनामुळे आज प्रियाचे ए. टी. टी. एफ. महाराष्ट्र अध्यश सुहास मोरे व सचिव अतुल धनवटे यांनी प्रियाचे कौतुक केले. एशियन स्पर्धा विजेता खेळाडू प्रिया हिस दिल्ली येथील एशियन ट्रक अॅण्ड टरफ फेडरेशनचे अध्यश डॉ. सुनिता गोदरा यांनी सिल्वर मेडल देऊन सन्मानित केले.

Protected Content