आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना पालकमंत्री ना. पाटील यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप

 

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना मदत व्हावी, यासाठी कै. दिलीप गोविंदा पाटील, वडली, कै. मुकेश सुकलाल पाटील, कानळदा, कै. आबासाहेब अमृत काळे, कंडारी, कै. प्रकाश मानसिंग पाटील, गाढोदा यांच्या कुटूंबियांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शासनाच्यावतीने धनादेशाचे वितरण करण्यात आले.

नाशिक विभागाचे विभागीय महसुल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या उभारी कार्यक्रमातर्गत पात्र लाभार्थ्यांच्या कुटूबांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा. त्यांच्या कुटुंबाना आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे तसेच शासन नेहमीच शेतक-यांच्या पाठीशी उभे असल्याचा विश्वास निर्माण करण्याचे निर्देशही यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेत.

Protected Content