जिल्ह्यातील ८३ संशयितांचे अहवाल निगेटीव्ह

जळगाव प्रतिनिधी । खासगी लॅबमध्ये तपासणीसाठी दिलेले ८३ संशयितांचे स्वॅब सँपल निगेटीव्ह आल्याची माहिती आज प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आली आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या वाढत असतांना बरे होणर्‍या रूग्णांची संख्यादेखील वाढीस लागल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. यातच आज सकाळी जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार ८३ रूग्णांचे अहवाल हे कोरोना निगेटीव्ह आहेत. या रूग्णांनी खासगी लॅबमध्ये तपासणीसाठी स्वॅब सँपल पाठविले होते.

जिल्ह्यात आजवर ९५७ रूग्ण कोरोना बाधीत आढळून आले असून यापैकी ४४८ रूग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत. जिल्ह्यात आजवर ११५ जणांचा मृत्यू झाला असून ३९२ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

Protected Content