कुसुंबाजवळ चारचाकीच्या धडकेत एक जण जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो कारने एकाला धडक दिल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवार ३० नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कुसंबा गावात राहणारा रविंद्र कोळी हा तरूण रविवारी २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता कुसुंबा गावातील कविता वाईन शॉपजवळून पायी जात होता. त्यावेळी मागून भरधाव वेगाने बोलेरो चार चाकी वाहनाने रविंद्र कोळी याला जोरदार धडक दिली. या धडकते रविंद्रला गंभीर दुखापत झाली. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. घटनास्थळाहून अज्ञात कार चालक हा पसार झाला होता. याप्रकरणी बुधवारी ३० नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता अज्ञात कार चालकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गफ्फार तडवी करीत आहे.

Protected Content