कोरोनावर मात करण्यासाठी व ऑक्सिजनची निर्मितीसाठी देशी झाडे लावा ; जिल्हाध्यक्ष नाना शंकर पाटील

 

भुसावळ, प्रतिनिधी । कोरोनाच्या प्रादुर्भावाचे एक लक्षण म्हणजे श्वास घेण्यास त्रास होणे, मानवासा जर शुद्ध, पुरेशा ऑक्सिजन मिळाला तर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल व मानवाच्या आरोग्यासाठी ही शुध्द प्राणवायूची आवश्यकता असते तो प्राणवायू आपल्याला देशी झाडा पासून मोठ्या प्रमाणात मिळू शकतो यासाठी वड, पिंपळ, निंब, सिसम, चिंच यासारखी झाडे लावा असे आवाहन “निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे’ जिल्हाध्यक्ष नाना शंकर पाटील यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तुकाराम नगर मधील माऊली नगरात आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात केले.

वेदांत नर्सरीचे संचालक संजीव पाटील यांच्या सहकार्याने परिसरातील नागरिकांना वड, पिंपळ, निंब या वृक्षाचे वाटप करण्यात आले. यावेळी अष्टांग योग समितीचे अध्यक्ष प्रा. अविनाश कुमावत यांनी झाडे लावा झाडे जगवा व आरोग्य जपा व कोरोनावर मात करा असा सल्ला दिला. या समितीचे सुरेन्द्र सिंग पाटील, अनिल माळी, नारायण पाटील , विजय देशपांडे आदींनी वृक्षारोपण केले. यावेळी भूषण माळी या महाविद्यालयीन तरुणाचा वाढदिवस असल्याने त्याने वृक्षारोपण केलेल्या झाडांची जगवण्याची व संगोपनाची जबाबदारीची प्रतिज्ञा घेतली. यावेळी परिसरातील संजय निकम, मुरलीधर वानखेडे, वैभव वानखेडे, पी. पी. पाटील, मालती चौधरी, देवेश देशपांडे, योगेश चौधरी, प्रशांत पाटील आदींनी सहकार्य केले.

Protected Content